करिअरच्या वाटचालीतील “डोण्टस्‌’ 

मेघना ठक्‍कर 

शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक जीवनात आपल्याला अनेक चढउतार अनुभवास येतात. यातून आपण शिकतो आणि पुढे जात असतो. जो शिकत नाही, तो मागे पडतो. कालबाह्य किंवा प्रतिगामी विचारांना जो धरून राहतो, तो कधीच प्रगती करू शकत नाही. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारा व्यक्ती करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो. दररोजच्या कामातून शिकण्याची तयारी अंगी ठेवल्यास करिअरमध्ये येणारे अडथळे आपण सहजपणे पार करू शकतो. अनेकदा आपण किरकोळ कारणावरून चुका करतो आणि करिअरमध्ये अडचणी निर्माण करतो. करिअरला हानी करणाऱ्या गोष्टीला आपण जवळ करतो आणि कालांतराने आपल्याला पश्‍चाताप होतो. अशा चुका सहज टाळता येऊ शकतात. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पैसा कमवण्यावर लक्ष देणे : करिअरची बांधणी करताना कधीही तात्पुरता फायदा पाहू नका. प्रत्येक वेळी पैसा हे साध्य नसते. करिअरची मजबूत पायाभरणी करताना प्रारंभीच्या काळात पैशापेक्षा अनुभवाची, कौशल्याची गरज अधिक भासत असते. सुरुवातीच्या काळात म्हणजेच फ्रेशर्स असताना एखाद्या चांगल्या कंपनीतील जॉब आपण कमी वेतनामुळे स्वीकारत नसाल तर ती आपली चूक ठरू शकते. कारण लहान सहान कंपनीत शिकण्याला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी भरपूर वाव असतो. याच कौशल्याच्या बळावर आपण भविष्यातील झेप घेऊ शकतो.

स्वत:ला सिद्ध न करणे : कामाच्या ठिकाणी स्वत:चे मार्केटिंग करणे किंवा स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करणे हे काहींना आवडत नाहीत. ही बाब व्यावसायिक जीवनासाठी नुकसानकारक ठरू शकते, या उद्देशातून ते स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण बॉसला किंवा वरिष्ठांना आपल्या कामाची जाणीव आहे. त्यामुळे मार्केटिंगची गरज कशाला, असा विचार करतात; परंतु हा विचार प्रत्येकवेळी लागू होतोच असे नाही.

कामाविषयीची बांधीलकी : स्वीकारलेले प्रत्येक काम आपण प्रामाणिकपणे पार पडणे अपेक्षित असते. अशा वेळी वेळ ही बाब महत्त्वाची ठरत नाही. तुम्ही ते कसे स्वीकारता आणि कसे पार पाडता, यावर आपले कौशल्य सिद्ध होत असते. एखादी जबाबदारी स्वीकारताना बघू, करू असा अविर्भाव अंगी बाळगला तर तो घटक करिअरसाठी अडथळे निर्माण करणारा ठरू शकतो.

तुलना करणे : एखादा व्यवसाय किंवा कौशल्य शिकण्यास प्रारंभ केला तर आपण अन्य व्यक्तीशी तुलना करू लागतो. आपल्या हातून होणारे काम त्यांच्याच तोडीचे व्हावे, अशी अपेक्षा मनात बाळगतो. मात्र, आपण त्यांचा संघर्ष पाहात नाहीत, चुकातून केलेली सुधारणा पाहात नाहीत, लहानसहान गोष्टीतून त्यांनी केलेली प्रगतीकडे लक्ष देत नाहीत, दिवसागणिक केलेली त्यांनी केलेल्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो. केवळ त्यांचे यशच पाहिल्यामुळे हताश व्हायला होते. आपण अपात्र असल्याची भावना निर्माण होते. आपला कालचा दिवस आणि आजचा दिवस कसा आहे ते पाहा. आपली प्रगती झाली नसेल तर अधिक कष्टाची तयारी ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)