करिअरचा नवा”कान’मंत्र 

अपर्णा देवकर 

करिअरसाठी आज उमेदवारांसमोर असंख्य पर्याय दिसून येतात. किमान बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला करिअरला पूरक ठरणारे असंख्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या मदतीने तो करिअरची निवड करू शकतो. पारंपरिक अभ्यासक्रम किंवा करिअरचा विचार करताना आपल्यासमोर इंजिनिरिंग, मेडिकल, कला, बॅंकिंग आदी क्षेत्र येतात. मात्र, या साचेबद्ध करिअरपेक्षा रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या श्रवणयंत्र आणि दुरुस्ती क्षेत्राचाही एकदा विचार करायला हवा. हिअरिंग (श्रवणयंत्र) अँड रिपेयरिंगचे (दुरुस्ती) एक नवीन क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. या क्षेत्राचा वेगाने विकास होत आहे. देशभरात दहा लाखांहून अधिक नागरिक श्रवणयंत्रणाचा वापर करतात. परिणामी श्रवणयंत्र आणि उद्योगाच्या विकास दरात दरवर्षी 7 टक्के वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याच्या काळात श्रवणयंत्र अधिक महाग झाले आहेत आणि अशा स्थितीत हे यंत्र इलेक्‍ट्रॉनिक तंत्रावर विसंबून राहात असल्याने खर्चातही वाढ झाली आहे. श्रवणयंत्र सर्वात लहान, हलके आणि शक्तिशाली उपकरण मानले जाते. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार श्रवणयंत्राच्या तंत्रातही बदल झाला आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रातील विकासाने दळणवळण माध्यमांच्या नवनवीन उपकरणांचा विकास केला आहे. त्याचा वापर करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. नेटवर्क प्रणालीचा वापर करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पोहोचवू शकतो. सूचना, माहितीचे आदानप्रदान करणे हे आजच्या काळातील महत्त्वाची बाब ठरत आहेत. ज्या माध्यमातून आपण विविध माहिती मिळवत असतो, त्यापैकी एकजरी माध्यम कमकुवत असेल तर माध्यमात, संवादात अडचणी येतात. संवाद हा आपल्या भावना, मत मांडण्याचे प्रभावी आणि सामान्य माध्यम आहे. विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी माध्यम साधनांचा वापर करतो. संवादाचे ग्रहण करण्यासाठी श्रवणशक्ती असणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे मौखिक संवाद समजण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी श्रवण इंद्रिय अर्थात कान सक्षम असणे महत्त्वाचे आहे. एखाद्याची श्रवणशक्ती कमकुवत असेल तर संवाद ग्रहण करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. संवादात आणि व्यक्तिमत्त्व कौशल्यामध्ये श्रवणाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेता मनुष्याने कर्णबधीर लोकांसाठी श्रवण उपकरणाचा विकास करण्यास प्रारंभ केला. त्यास आपण हिअरिंग एड (श्रवणयंत्र) असे म्हणतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रवणयंत्र कसे असते 
कर्णबधीर व्यक्तींना अत्यंत साह्यभूत ठरणारे श्रवणयंत्र हे एकप्रकारचे वरदानच मानले जाते. कमी ऐकू येणाऱ्या व्यक्तींना, कर्णबधीर किंवा वयस्क लोकांसाठी श्रवणयंत्र उपयुक्त आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी भोपूसारखे मोठे श्रवणयंत्र असायचे. एखादा सडपातळ कर्णबधीर व्यक्ती तो भोपू कानाला लावून बसायचा आणि बोलणारी व्यक्ती जवळ असायची. सध्याच्या काळात श्रवणयंत्रात बॅटरी, मायक्रोफोन, ट्रान्झिस्टर आणि चिप्स बसवलेले असतात. हे साधन श्रवणक्षमता वाढवण्यासाठी हातभार लावतात. 1950 च्या दशकात ट्रान्झिस्टरच्या शोधाने श्रवणयंत्रणाची परिभाषा बदलून गेली आहे. ट्रान्झिस्टरमध्ये ऑन-ऑफचे बटण असते. वास्तविक या ट्रान्झिस्टरला रेडिओच्या रूपात आणण्यापूर्वी दोन वर्ष अगोदरपर्यंत श्रवणयंत्रात त्याचा वापर केला जात असे. सिलिकॉन येथून ट्रान्झिस्टर तयार केल्याने श्रवणयंत्रणाचा आकार लहान करण्यात मदत मिळाली. ट्रान्झिस्टरच्या मदतीने अगोदर हा शरिराचा भाग बनला आणि त्यानंतर कानामागे, नंतर कानाच्या आत आणि नंतर कानाच्या नळीत लावले जाणारे उपकरण बनले.

आजच्या घडीला देशात दहा लाखांहून अधिक नागरिक श्रवणयंत्राचा वापर करतात. श्रवणयंत्रण उद्योगातील विकासाचा दर हा दरवर्षी 7 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता गृहित धरली जात आहे. 1995 पर्यंत डिजिटल श्रवणयंत्र हे तंत्रज्ञानाच्या उपयोगात राहिले आहे. डिजिटल सरकिट्री, आवाजाला गरजेनुसार वाढवणे किंवा कमी करणे आदी सुविधा श्रवणयंत्रणात प्रदान करण्यात आल्या आहेत. सध्याच्या काळात श्रवणयंत्र हे सर्वात लहान, हलके आणि शक्तिशाली उपकरण होय. आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार श्रवणयंत्राची रचना करण्यात येते. नवीन श्रवणयंत्र हे कोणत्याही तारेशिवाय, टेलिफोन, टेलिव्हिजन, स्टेरिओ आणि संगणकातून ध्वनी प्राप्त करतात. आधुनिक श्रवणयंत्रात मायक्रोस्कोपिक प्रोटेक्‍टिव्ह कवच असते. हे कवच त्याचा खर्च कमी करण्यास मदत करतात आणि त्याचे आयुष्यमान वाढवतात.

बाजारात सध्या श्रवणयंत्राचा खर्च हा वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे निश्‍चित होतो. हजार रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत हा खर्च होतो. श्रवणयंत्रणाचा बेस हा इलेक्‍ट्रॉनिक असल्याने त्याची सतत देखभाल आणि दुरुस्ती करणे अनिवार्य ठरते. एकूणात श्रवणयंत्रण दुरुस्ती हे करिअरचे नवीन क्षेत्र म्हणून उदयास येत आहे आणि त्याचा वेगाने विकास होत आहे. आपणही यात करियर उज्ज्वल करू शकता. श्रवणयंत्र आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी त्याचे प्रशिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पात्रता – या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या उमेदवाराला इलेक्‍ट्रॉनिक उपकरण, त्याची रचना, कार्यपद्धती आणि विशेषत: ऍम्लिफायरशी संबंधित उपकरणाचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. सर्किटमधील सिग्नल फ्लोची माहिती देखील असणे आवश्‍यक आहे. याचबरोबर प्रिंटेड सर्किट बोर्डचे ज्ञान असावे. त्याला श्रवणयंत्र दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाची माहिती असावी. या क्षेत्रातील सेवेच्या अभावामुळे भारतात बहुतांश ज्येष्ठ व्यक्ती, विशेषत: शालेय विद्यार्थी ग्रामीण भागातील नागरिक, कर्णबधीर, महिला, व्यक्ती हे श्रवणयंत्राचा वापर करत नाहीत किंवा त्याचे प्रमाण नगण्य असते. म्हणूनच या क्षेत्रात रोजगाराची व्यापक संधी आहे. कुशल व्यक्ती खासगी श्रवणयंत्र दुरुस्ती केंद्र सुरू करू शकतो. अशा केंद्रात कमीत कमी गुंतवणूक दहा हजार रुपये करणे अपेक्षित आहे.

या क्षेत्राकडे युवकांचे लक्ष क्वचितच जाते. त्यामुळे या क्षेत्रात कुशल उमेदवारांची चणचण भासते. या क्षेत्रात रोजगाराची संधी अधिक असल्याने श्रवणयंत्र आणि तंत्रज्ञ हे अनेक श्रवणयंत्र कंपन्यांसमवेत सर्व्हिस इंजिनिअरच्या रूपातून काम करू शकतात. त्यांना या क्षेत्रात प्रचंड संधी आहे. याशिवाय स्पिच आणि हिअरिंगशी निगडित असलेले कॉलेज आणि शैक्षणिक संस्थेत शिक्षक तसेच प्रयोगशाळा सहायक म्हणून काम करू शकतात. श्रवणयंत्र सेवेत सुधारणा आणण्यासाठी राज्य सरकारने देखील सर्वच जिल्हा पुनर्वसन केंद्र सुरू केले आहेत. तेथे श्रवणयंत्र आणि तंत्रसहायकाला रोजगार दिला जातो. यानुसार श्रवणयंत्र आणि तंत्रज्ञासाठी देशातच नाही तर परदेशातही रोजगाराची संधी आहे.

शैक्षणिक पात्रता 
श्रवणयंत्र आणि तंत्रज्ञान संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध डिप्लोमा, अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराचा बारावीला भौतिक विषय असावा. इलेक्‍ट्रॉनिक, विद्युत अभ्यासक्रमात डिप्लोमा असेल किंवा आयटीआय इलेक्‍ट्रॉनिक/ विद्युतचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तो याअभ्यासक्रमाला पात्र असेल. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पिच अँड हिअरिंग आदी संस्थांमध्ये अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालतात.

प्रमुख संस्था 
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पिच अँड हिअरिंग (एआयआयएसएच) म्हैसूर
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पिच अँड हिअरिंग (एनआयएसएच) करमिनाल, त्रिवेद्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)