कराड – हद्दपार केलेला संशयित पुन्हा कराड शहरात आढळून आल्याने मंगळवार दि. 22 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. अनिल रविंद्र वारे (वय 24, रा. बुधवार पेठ, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनिल वारे याला जिल्हा पोलिस प्रमुखांच्या अदेशानुसार कराडसह सातारा, खटाव, पाटण, माण, कोरेगाव तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्‍यातून 1 वर्षांसाठी हद्दपार केले होते. 4 मार्च रोजी त्याला विश्रामबाग, सांगली येथे मावस भावाकडे पोहच केले होते. मात्र, त्यानंतर तो जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशाचा भंग करून कराड शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषन विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी कराड बसस्थानकाजवळील नवग्रह मंदीराशेजारी ताब्यात घेऊन वारे याला अटक केली. या कारवाई वेळी पोलिस हवालदार विनोद माने यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. बुधवार दि. 23 रोजी अजित वारे याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सपोनि हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)