कराड भाजीमंडईत चालतेय हात की सफाई

कराड : येथील भाजीमंडई परिसरात अशाप्रकारची नेहमीच गर्दी झाल्याचे दिसते. छाया : राजू सनदी.

भुरट्या चोऱ्यांचे सत्र वाढले ; आणखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

सुनिता शिंदे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड, दि. 11 – येथील भाजीमंडईचा विस्तार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. जेवढे भाजी विकणारे आहेत, तेवढेच घेणारेही आहेत. गुरुवार आणि रविवारी भाजी मंडईमध्ये गर्दीचा उच्चांक होतो. नेमका याच गर्दीचा फायदा छोटे-मोठे भुरटे चोर उठवू लागले आहेत. गर्दीत हे लोक कधी हातसफाईफ करतात हे कळतही नाही. अनेकवेळा घरी गेल्यानंतरच नागरिकांच्या लक्षात येते. तर काहींच्या लक्षात येऊनही काही उपयोग होत नाही. नगरपालिकेने तीन ते चार ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले आहेत. परंतु या भुरट्या चोरांच्या हातसफाईपुढे सीसीटीव्हीही मागे पडत आहेत. हे कॅमेरे मर्यादित भागापुरतेच आहेत. तर भाजीमंडई विस्तारु लागली आहे. त्यामुळे कॅमेरे नसलेल्या भागात चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. येथील पोलीस चौकीमध्ये तक्रार करुनही चोरांना पोलीस पकडू शकलेले नाहीत.

कराड शहर हे जिल्ह्यातील इतर तालुक्‍याच्या मानाने पुढारलेले शहर आहे. येथे असणाऱ्या शैक्षणिक व इतर सुविधांमुळे नागरिकांचा येथे राबता वाढू लागला आहे. तसेच पाटण, खटाव, कडेगाव, इस्लामपूर या गावातील लोकांना बाजारहाटासाठी व इतर तत्सम खरेदीसाठी कराडला येत असतात. त्यामुळे नागरिकांची दररोजच येथे रेलचेल असते. कराड येथील भाजीपाला पुणे-मुंबईलाही पाठविला जातो. तसेच नोकरदार वर्गाची संख्याही मोठी असल्याने शेजारच्या गावातील शेतकरी व भाजी विक्रेत्यांना कराडमध्येच यावे लागते.

येथील आठवडी बाजाराचे गुरुवार व रविवार असे दोन दिवस असले तरीही इतर दिवशीही भाजी खरेदीसाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. गुरुवारी मुख्य भाजीमंडई बरोबरच नागरिकांच्या सोयीसाठी संभाजी भाजी मार्केट खुले करण्यात आले आहे. येथेही नागरिकांची गर्दी असते. मात्र शहरातील मुख्य भाजी मंडईत होणाऱ्या गर्दीचा फायदा अनेक छोटे-मोठे चोर उठवत आहेत. अनेकांचे मोबाईल, पर्स चोरीला गेल्याच्या घटना प्रत्येक आठवडी बाजारात घडत आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी लागेली झुंबड पाहून त्याचाच फायदा हे उठवत आहेत. शक्‍यतो सायंकाळच्या वेळेस भाजी स्वस्त मिळत असल्याने महिला भाजी खरेदीसाठी बाहेर पडतात. भाजी खरेदीनंतर घरी जाण्याची ओढ त्यांना लागलेली असते. त्यामुळे पिशवीकडे फारसे लक्ष त्यांचे नसते याचाही फायदा या चोरांना होतो. वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहून मध्यंतरी भाजीमंडईतील नागरिकांनी वॉच ठेवून काही भुरट्या चोरांना पकडले होते. तरीही चोऱ्यांचे सत्र अजुनही सुरुच आहे.

 

ऍन्ड्राईड मोबाईल होतात लंपास

आजकाल बाजारपेठेत ब्रॅन्डेड कंपनीचे ऍडव्हान्स मोबाईल उपलब्ध होत आहे. हे मोबाईल खरेदी करण्यासाठी नागरिकांचा जास्त कल असतो. प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहेत. भुरटे चोर भाजीमंडईमध्ये येणाऱ्या महिला व पुरुषांच्या हातातील हे ऍन्ड्राईड मोबाईल लंपास करुन जुन्या बाजारात निम्म्या किंमतीने विकले जातात.

 

चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
भाजी मंडई परिसरात होत असलेल्या चोऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांनी पालिका व पोलीस प्रशासनाकडे या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार तीन ते चार ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये नगरपालिका, भाजी मंडई चौक व समता गणेश मंडळासह इतर ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत. मात्र जो भाग सीसीटीव्हीत दिसत नाही. त्याच भागात जास्तीत जास्त प्रमाणात चोऱ्या घडतात. काही नागरिकांनी पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. मात्र अजुनही एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तर चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणारी ही पोलीस चौकी अनेकवेळा बंदच दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलीस प्रशासनाची बघ्याची भुमिका

भाजी मंडई परिसरातून पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सुमारे अडीच लाख रुपयांची दुचाकी चोरुन नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मात्र येथील पोलीस प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे. कॅमेरामध्ये चोर गाडी चोरुन नेताना दिसत असतानाही पोलिसांना चोराला अजुनही पकडता आलेले नाही. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.

नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पालिका व पोलीस प्रशासनाच्या पाठीमागे लागून भाजी मंडई परिसरात तीन ते चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे या परिसरात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या चार चोऱ्यांमधील चोरांना पकडण्यात यश आले आहे. बुधवार पेठेमधील भागाकडेही भाजीमंडई सरकू लागल्याने येथेही सीसीटीव्ही गरज वाटू लागली आहे.
प्रकाश जाधव,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)