कराड पालिकेत उर्वरित 565 हरकतींवर सुनावणी

कराड – शहरातील मिळकतींवर पालिकेने नव्याने केलेल्या कर आकारणींवर सुमारे 19 हजार मिळकत धारकांपैकी 1475 मिळकत धारकांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्यातील 910 हरकतींवर थेट नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली होती. त्यानंतर उर्वरित 565 हरकतींवर मंगळवारी सुनावणी झाली.

शहरातील 19 हजार मिळकत धारकांना पालिकेने 40 टक्के संकलित कर असणाऱ्या नोटिसा वाटल्या होत्या. त्यावरुन पालिकेत गदारोळ माजला होता. विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांनीही याला विरोध दर्शवित पुन्हा 5 टक्के संकलित कर वाढवून नोटिसा देण्याबाबत संबंधित कंपनीस सुनावले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 5 टक्के कर आकारुन नोटिसा देण्यात आल्या. या नोटिसा दिल्यानंतरही मिळकत धारकांनी पालिकेत हरकती नोंदविल्या.

ही वाढ पाच टक्के नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.एकूण मिळकतधारकांपैकी 1475 मिळकतधारकांनी पालिकेत हरकती नोंदविल्या होत्या. त्यातील 910 हरकतींवर थेट नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी करण्यात आली तर उर्वरित 565 हरकतींवर मंगळवारी सुनावणी झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)