कराड पालिकेत ई-कचऱ्याबाबत कार्यशाळा

कराड – कराड नगरपालिका व एनव्हायरो फ्रेंडस्‌ नेचर क्‍लब यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत ई-कचरा व जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापन करीत असताना त्यामध्ये आढळणारा ई-कचरा व जैववैद्यकीय कचरा यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

ई-कचरा व जैववैद्यकीय कचरा म्हणजे काय, तो कसा हाताळायचा, त्याचे परिणाम, योग्य व्यवस्थापन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. रजनीश पिसे, एनव्हायरो नेचर क्‍लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, डॉ. राहुल फासे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. संतोष अंबवडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रबोध पुरोहित यांनी आभार मानले. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, आरोग्य सभापती प्रियांका यादव, नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, फारुक पटवेकर, विद्या पावसकर, आशा मुळे, प्रीतम यादव उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)