कराड पालिका विषय समितीच्या निवडी उत्साहात

हणमंतराव पवार यांच्याकडे बांधकाम, शिक्षण सभापतीपदी जयवंतराव पाटील

कराड – कराड पालिकेच्या स्थायी समिती, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व विकास समितीसह सर्व समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडी मंगळवारी उत्साहात पार पडल्या. पालिकेत जनशक्‍ती आघाडीचे बहुमत असल्याने सर्व विषय समितीच्या सभापती व उपसभापतीपद हे जनशक्‍तीकडेच आले आहे. तर सदस्य पदांमध्ये जनशक्‍तीबरोबरच लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व विनायक पावसकर वगळता भाजपच्या एकाही सदस्याच्या नावाचा विषय समित्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. बांधकाम व शिक्षण समितीच्या सभापतीपदी हणमंतराव पवार व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची पुन्हा वर्णी लागली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे होत्या. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी विषय समितीच्या सभापतीपदासाठी असणारे नामनिर्देशन पत्र स्विकारले. यानंतर पिठासन अधिकारी हिंमत खराडे यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली व निवडी जाहीर केल्या.

स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची तर उपसभापतीपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी पुन्हा हणमंत पवार तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची पुन्हा वर्णी लागली. महिला व बालकल्याण विभागाच्या समितीच्या सभापतीपदी स्मिता हुलवान व उपसभापतीपदी प्रियांका यादव यांची निवड करण्यात आली. आरोग्य विभागाच्या सभापतीपदी गजेंद्र कांबळे, पाणी पुरवठा विभागाच्या सभापतीपदी अर्चना ढेकळे तर नियोजन व शहर विकास समितीच्या सभापतीपदी विजय वाटेगावकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व समितीच्या निवडी शांततेत पार पडल्या. निवडीदरम्यान पालिकेत नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. निवडीनंतर पालिका परिसरात फटाक्‍यांची आतषबाजी केली. निवडीनंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पिठासन अधिकारी हिंमत खराडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांचा सत्कार केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)