कराड तालुक्यात जुगार, दारू धंद्यांवर छापे

कराड, दि. 16 (प्रतिनिधी)-पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या विशेष पथकाने तालुक्यातील दोन जुगार आणि सहा अवैध दारू धंद्यांवर छापे मारून जुगाराचे साहित्य, दारूच्या बाटल्या, असा एकूण साडे सहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी, खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे मारले. त्यामध्ये विक्रम महादेव बोंद्रे, संजय महादेव यादव, बाळासाो दिनकर गायकवाड (तिघेही रा. कासारशिरंबे, ता. कराड), लखन सुरेश जाधव (रा. गोसावी वस्ती-कोळे, ता. कराड), सौ. सिंधुताई रघुनाथ घाडगे (रा. कार्वे, ता. कराड), आत्माराम विठ्ठल मदने (रा. वडगाव हवेली, ता. कराड) यांना बेकायदेशीररित्या दारू विक्री करताना पकडले. या छाप्यात 5 हजार 252 रूपये किंमतीच्या 101 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच रेठरे व ओंड येथील मटका अड्ड्यावर छापा मारून सचिन राजेंद्र हिवरे (रा. शिवनगर, ता. कराड) आणि दत्तात्रय कुलदीप मोरे (रा. ओंड, ता. कराड) यांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य व रोकड मिळून 1300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या आदेशान्वये आणि पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, शिंदे, उपनिरीक्षक राठोड, भापकर, अनिल चौधरी, हवालदार अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)