कराड उत्तर मधील पूर्वीच्या गावांमधील स्नेह कायम : आ. पाटील

मसूर, दि. 11 (प्रतिनिधी) – पूर्वीच्या कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील गांवे पुनर्रचित विधानसभा मतदार संघामुळे कमी झाली असली तरी या सर्व गावांप्रती स्नेह कायम आहे. या सर्व गावांमध्ये आमदार निधी मधून थेट निधी देता येत नसला तरीही कोयना भूकंप निधीच्या माध्यमातून तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावातील विकास कामांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.

खोडशी, ता. कराड येथे कोयना भूकंप विकास निधीमधून 7 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉंक्रीटीकरण कामाच्या भुमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कराड पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंग चव्हाण, जयसिंग पाटील, राजेंद्र पाटील, बाळासो पाटील, महेश काटकर, शामराव पाटील, श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्रि कारखान्याची निर्मिती केली व त्याचीच जबाबदारी आदरणीय पी. डी.पाटील साहेबांवर दिली. त्यांनी ती समर्थपणे पार पाडून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविणेसाठी प्रयत्न केले. यापुढील काळातही कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. असेही आ. पाटील यांनी सांगीतले.

यावेळी तंटामुक्‍ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संभाजी भोसले यांचा आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एस. आर. कदम यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी स्वप्नील जाधव, संभाजीराव पाटील-भोसले, रज्जाक सुतार, सुभाष पाटील, उत्तम भोसले, सिकंदर सुतार, भानुदास कदम, ताजुद्दिन मुजावर, धनाजी जाधव, माणिकराव भोसले, संतोष चव्हाण, संकेत कदम, अक्षय भोसले, अभिजीत जाधव, अल्ताफ इनामदार, इंजिनिअर राजाराम जाधव, ग्रामसेवक जे. जी. साळुंखे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)