कराड उत्तरमधील रस्त्यांसाठी 13.50 कोटींचा निधी मंजूर

कराड – कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील खालील रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून सदर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक निधी उपलब्ध होण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांनी शासनाकडे वारंवार मागणी करुन पाठपुरावा केला. सदर कामांना नोव्हेंबर 2018 च्या पुरवणी अर्थसंकल्पातून मंजूरी मिळाली असून त्यासाठी एकूण 13.50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

आ. पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड उत्तरमधील रस्त्यांच्या कामांना मंजूरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होवून कामे पुर्णत्वास जाणार आहेत. त्यामुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये शिरगाव, पेरले, खराडे, हेळगाव, पाडळी, सुर्ली, रहिमतपूर रस्ता 39 कि. मी., सुर्ली ते रहिमतपूर, ता. कोरेगाव 2.18 कोटी, मल्हारपेठ, मसूर, मायणी, महूद, पंढरपूर रस्ता, शिवडे ते अंतवडी फाटा 8.26 कोटी, तसेच खंडाळा, कोरेगाव, कराड, सांगली, शिरोळ रस्ता 142 कि. मी., हणबरवाडी ते बनवडी फाटा 2.83 कोटी या रस्त्यांचा समावेश आहे. आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी आ. पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)