कराड अर्बन सेवक संघाच्या अध्यक्षपदी सुहास पवार

कराड, दि. 11 (प्रतिनिधी) – कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सेवक संघाची नवीन कार्यकारिणीची निवड बॅंकेच्या शताब्दी सभागृहामध्ये पार पडली.
कराड अर्बन बॅंक सेवक संघाच्या अध्यक्षपदी सुहास पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, सेवक संघाचे माजी अध्यक्ष दिलीप चिंचकर सर्व उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक व सर्व सेवक उपस्थित होते.
कराड अर्बन बॅंक सेवक संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही यावेळी करण्यात आल्या. यामध्ये उपाध्यक्षपदी विकास खबाले, खजिनदारपदी जगदिश त्रिवेदी, सचिवपदी महेश ढवळे व सहसचिवपदी गजानन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. सेवक संघाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्सव, गुणवंत सेवक पाल्यांचा सत्कार, सेवकांसाठी विविध स्पर्धा व इतर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
नुतन पदाधिकाऱ्यांचा बॅंकेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व उपमहाव्यवस्थापक व सहाय्यक महाव्यवस्थापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अर्बनकुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व संचालकांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)