कराड अर्बन बॅंकेची शतकोत्तर वाटचाल सातत्यपूर्ण प्रगतीपथावर : सुभाषराव जोशी

विद्यानगर : कराड अर्बनच्या विद्यानगर शाखेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना सुभाषराव जोशी. समवेत डॉ. सुभाष एरम व इतर.

कराड दि. 2 (प्रतिनिधी) : कराड अर्बन बॅंकेला शंभर वर्षाचा दैदीप्यमान इतिहास आहे. सभासद, खातेदार यांच्या प्रचंड विश्‍वासाच्या बळावर बॅंकेची शतकोत्तर वाटचाल सातत्यपूर्ण प्रगतीपथावर राहील असे उद्‌गार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले.
ते बॅंकेच्या विद्यानगर शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळाव्यात बोलत होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुभाष एरम म्हणाले, कराड अर्बन बॅंकेने पार्श्‍वनाथ बॅंक, अजिंक्‍यतारा महिला सहकारी बॅंक व अजिंक्‍यतारा सहकारी बॅंक या बॅंकांचे विलीनीकरण करून घेतल्यामुळे बॅंकेला शाखा मिळाल्या. बॅंकेच्या या शाखा विस्तारामुळे प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. तसेच व्यवसायात वाढ झाली असून भविष्यकाळात बॅंकेच्या प्रगतीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमात चंद्रकांत भिसे यांना मारूती स्विफ्ट, विकास भोसले यांना बोरेलो, सागर भोसले यामहा एफ झेड व सर्जेराव पाटील ज्युपीटर यांना मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे वितरण करण्यात आले. प्रविण पाठक, पांडुरंग कुंभार, लक्ष्मण चव्हाण, बाळासो पाटील, दिलीप डोंबाळे, हणमंत कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडाक्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल स्नेहा जाधव, तपस्या काशिद यांचा तसेच हॉंगकॉंग येथे अबॅकस स्पर्धेत गोल्ड व सिल्व्हर मेडल प्राप्त झाल्याबद्दल शुभम जाधव व राजवीर जाधव यांचा व होली फॅमिली स्कूल, सदगुरू गाडगे महाराज कॉलेज व डॉ. दौलतराव आहेर कॉलेज येथील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात अभिजीत चिंगळे, प्रविण पाठक, उदय थोरात, प्रा. जी. व्ही. कुलकर्णी, सैदापूरच्या सरपंच दिपाली जाधव, वेरेदिनीया, अभयसिंह पाटील, प्रल्हाद देशपांडे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. प्रारंभी उप महाव्यवस्थापक मनोज शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. शाखा व्यवस्थापक राजेंद्र डोळ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)