कराड : … अखेर बिबट्या बचावला

चोरजवाडी (ता. कराड) येथील डोंगर पायथ्याला तडफडत पडलेला बिबट्या तातडीच्या उपचारामुळे वाचला. दोन वर्षे वयाच्या या बिबट्याला उपासमारीमुळे हालचाल करता येत नव्हती. भुकेने व्याकूळ झालेला बिबिट्‌या फक्त डरकाळ्या फोडत होता. त्यामुळे काही काळ बिबट्याच्या डरकाळीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील उपचार केल्याने बिबट्याला जिवदान मिळाले.

याबाबतची माहिती अशी, शनिवारी (दि. 29) रात्री 8 च्या सुमारास जयवंत शुगर कारखान्याच्या पुढे चोरजवाडी गावच्या नजीक डोंगर पायथ्याला एक बिबट्या ओढ्यानजीक तडफडत पडला असल्याची माहिती एका गुराख्याने कराड येथील वनक्षेत्रपाल डॉ. अजीत साजणे यांना दिली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल साजणे यांनी बीट गार्डला तात्काळ घटनास्थळी पाठवून परस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गार्डने घटनास्थळी जाऊन पाहिले असता, डोंगर पायथ्याला एका ओढ्यालगत बिबट्या तडफडत असल्याचे त्याला दिसले. जमिनीवर पडलेला बिबट्या अधून मधून डरकाळी फोडत होता. ही परीस्थिती गार्ड ने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. तोपर्यंत रात्रीचे सव्वा नऊ वाजले होते. त्यातच पाऊस पडत होता.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वनक्षेत्रपाल साजणे यांनी फोनाफोनी करुन सर्व ठिकाणच्या गार्डना घटनास्थळी पोहचण्याचे आदेश दिले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी शोधायला सुरुवात केली. त्या दरम्यानच रात्री 10 वाजता मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मदतीसाठी बोलावून घेतले.

दरम्यान, सातारा येथून मोबाईल स्कॉडचे वनक्षेत्रपाल संदीप गवारे हे घटनास्थळी दाखल झाले.
भुकेने व्याकूळ बिबट्या फक्त तोंडाने प्रतिकार करत होता. त्याला चारही पाय हलवता येत नव्हते. त्यामुळे बिबट्याला पकडणे सोपे गेले. पकडलेल्या बिबट्याला घेऊन गाडी कराडच्या दिशेने निघाली. तोपर्यंत सातारहून मोबाईल स्कॉडचे वनक्षेत्रपाल संदीप गवारे आले. त्यामुळे जखमी बिबट्यावर लागलीच उपचार सुरु केले. त्यास पुढील उपचारासाठी सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)