कराडामध्ये सात लाखांची रोख रक्कम चोरीस

कराड – येथील कृष्णा नाक्‍यावरील उज्जिवन स्मॉल फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी सात लाख सात हजार रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरी चोरून नेली. रविवारी रात्री ही घटना घडली.

घटनास्थळी डॉग स्कॉड, ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे. डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या कालावधीत रोख रकमेसह कपाटच चोरट्यांनी चोरून नेल्याने खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षक राजमाने यांनी पंचनामा केला आहे. याबाबत मॅनेजर पंकजकुमार प्रकाश ताटे यांनी पोलिसात फिर्याद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)