कराडात 4 फेब्रुवारीपासून शॉपिंग फेस्टिव्हल

रोटरी क्‍लबचा पुढाकार : सहभागी होण्याचे आवाहन

कराड – रोटरी क्‍लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्‍लब यांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात येत असलेल्या दुसऱ्या शॉपिंग फेस्टिव्हलची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दि. 9 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान हे फेस्टीव्हल भरणार आहे. कराडचे हे एकमेव व्यावसायिक प्रदर्शन असून वाहन, कपडे, ज्वेलरी, गृहोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फिटनेस, बांधकाम, शैक्षणिक संस्था, खाद्यपदार्थ, फर्निचर, सौंदर्यविषयक उत्पादने, बॅंका आदी क्षेत्रातील 150 पेक्षा जास्त नामवंत व्यावसायिकांचा यामध्ये सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेस्टिव्हलच्या कालावधीत मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यामध्ये गाण्यांचे कार्यक्रम, मेहंदी स्पर्धा, पाककला, फॅन्सी ड्रेस, देशभक्‍तीपर कार्यक्रम होणार आहेत. दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत. अबालवृद्धांसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तूंचा यात समावेश असणार आहे. तसेच खाद्य पदार्थांचेही स्टॉल मांडण्यात येणार आहेत. शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजना पाठीमागे कर्करोग जनजागृती अभियानाला हातभार लावणे हा रोटरी क्‍लबचा उद्देश आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा कर्करोग जनजागृतीसाठी वापरला जाणार आहे. तसेच फेस्टिव्हलमध्ये कर्करोगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचेही आयोजन केले जाणार आहे.

मोफत तपासणीही केली जाणार आहे. कृष्णा विद्यापिठाच्या ऍन्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या मदतीने हे शिबीर आयोजित करण्यात येत आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत प्रबोधन व शंका निरसन करण्यात येणार आहे. तसेच दि. 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिनानिमित्त भव्य महारॅली काढण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी प्रेसिडेंट डॉ. राहुल फासे, ट्रस्ट अध्यक्ष शशांक पालकर, क्‍लब सेक्रेटरी प्रबोध पुरोहित, फेस्टिव्हल चेअरमन जगदिश वाघ, को-चेअरमन सागर जोशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)