कराडात पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कराड – विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनास मंगळवारपासून प्रारंभ झाला. पालिकेत 327 कर्मचारी कार्यरत असून 300 कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. पाणी पुरवठा व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यात सहभाग नसल्याचे नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर झालेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी न झाल्याने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या मागण्यांबाबत दि. 24 ऑगस्ट 2018 रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मात्र याबाबत कार्यवाही झालेली नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन चालढकल करत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. पालिकेत दोनशे कंत्राटी कामगार असून त्यांचाही या आंदोलनात समावेश नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, लोकशाही आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामबंद केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेतली. आपल्या मागण्या रास्त आहेत. मात्र शहर स्वच्छतेचे काम थांबवू नये, अशी विनंती सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी केली. गतवेळेस केलेल्या सात दिवसांच्या आंदोलनाप्रसंगी शहरात कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरले होते. ते स्वच्छ करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी गेला. ही वेळ पुन्हा येवू नये, गावाच्या हितासाठी स्वच्छतेचे काम सुरु ठेवावी, अशी विनंती केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)