कराडात दोन जुगार अड्ड्यांवर छापा

कराड – शहर पोलीसांकडून बसस्थानक परिसरात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह सुमारे 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी दुपारी अडीच वाजता करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बसस्थानक परिसरात नवग्रह मंदिर शेजारी साई लॉटरीच्या आडोशास छापा टाकून तौफिक फारुख बागवान (वय 28 वर्षे) रा. गुरुवार पेठ, कराड यास कल्याण मटका जुगार चालवत असताना छापा टाकून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे 13 हजार 603 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याच परिसरात ओमसाई पानशॉपच्या आडोशास छापा टाकून संदीप रामचंद्र कारंडे (वय 40 वर्षे) रा. बनवडी व राजेंद्र विठ्ठल मासाळ रा. मलकापूर, ता. कराड यांना कल्याण मटका जुगार चालवत असताना छापा टाकून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 9 हजार 160 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपास पोलीस हवालदार पी. के. कदम व आर. पी. पुजारी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)