कराडात तीन ठिकाणी घरफोडी

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

कराड, दि. 5 ( प्रतिनिधी) – कराड (कार्वे नाका) येथे चोरट्याने धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करुन सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. मंगळवार, दि. 4 रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे कराड परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत चंद्रकांत हिंगमिरे यांच्या कार्वे नाका, शिक्षक कॉलनी, पाण्याची टाकीजवळ असलेल्या राहत्या घराचा दरवाजाचा व दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील साहित्य विस्कटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मनी मंगळसूत्र चोरुन नेले. चोरट्यांनी जाताना त्यांच्याच दुकानातील साहित्य ही चोरुन नेले. असा हिंगमिरे यांचे घर व दुकानातील सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत चंद्रकांत हिंगमिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे
दरम्यान, याच परिसरात शिक्षक कॉलनी येथे विकास जगताप यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. विकास जगताप गावी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दागिने रोख रक्कम घेऊन कपाटातील साहित्य विस्कटून चोरटे पसार झाले.
याबाबत लोकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून डीवायएसपी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना केल्या.

-Ads-

बाजूच्या घरांच्या दरवाजाला बाहेरुन कडी

चोरी करत असताना चोरट्यांनी इतरही तीन ते चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. चोरी करत असताना शेजारच्या घरातील लोक जागे झाले तरी बाहेर येऊ नयेत म्हणून आजूबाजूच्या घरांना बाहेरुन कडी लावली होती. रात्रीच्या वेळी काही लोकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी एकमेकांना फोन करुन उठवले. त्यावेळी आपल्या बिल्डिंगमध्ये व परिसरात चोरी झाल्याची बाब समोर आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)