कराडात आणखी सहा दुचाकी हस्तगत

कराड, दि. 21 (प्रतिनिधी) – येथील शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांकडून चोरीच्या आणखी सहा दुचाकी हस्तगत केल्या. यामुळे हस्तगत केलेल्या गाड्यांची संख्या 29 झाली आहे. ढेबेवाडी परिसरासह करमाळा येथे या गाड्या विकण्याात आल्या होत्या, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी दिली. दरम्यान, गाड्या चोरीला गेलेल्या नागरीकांनी आज पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. 29 गाड्यांमधील बहुतांशी गाड्यांचे मालक निष्पन्न झाले आहेत.
स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. सह्याद्रि रूग्णालय परिसरात काही संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्याने हवालदार नितीन येळवे, हवालदार प्रदीप कदम हे तातडीने तेथे पोहोचले.
त्यावेळी शशिकांत रघुनाथ कांबळे (रा. तांदूळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) हा संशयित त्यांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर 17 दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी सोमवारी 15 दुचाकी हस्तगत केल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)