कराडात अल्पवयीन मुलीचा गळा चिरला

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) –अल्पवयीन मुलीचा तिच्या राहत्या घरात शिरून गळ्यावर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास येथील शिवाजी स्टेडियम परिसरातील झोपडपट्टीत घडली. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर संशयीत पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
येथील शिवाजी स्टेडियम परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये तिच्या हातावर व गळ्यावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला असून घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. हल्ल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी तशाच अवस्थेत घरातून बाहेर पळत आल्याने हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. नातेवाईकांनी तातडीने मुलीला उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
2 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)