कराडातील मोकाशी कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलला आग

कराडात कॉन्फरन्स हॉलला शॉर्ट सर्किटने आग

कागदपत्रांसह फर्निचर खाक; 15 लाखाचे नुकसान

कराड – राजमाची, ता. कराड येथील दादासाहेब मोकाशी कॉलेजमधील बंद असलेल्या कॉन्फरन्स हॉलला शॉर्ट सर्किटने लागलेल्या भीषण आगीत महत्वाच्या कागदपत्रांसह फर्निचर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याचे सुमारास घडली. अचानकपणे इमारतीच्या बाहेर धुराचे लोट दिसू लागल्याने सर्वाचीच पळापळ झाली. या आगीत सुमारे 15 लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्‍यातील राजमाची येथील दादासाहेब मोकाशी कॉलेजमध्ये असलेल्या सुसज्ज अशा कॉन्फरन्स हॉलमध्ये अचानकपणे शॉर्ट सर्किट झाल्याने सकाळी आग लागली. या आगीत कॉलेजमधील महत्वाची कागदपत्रे, फर्निचर, शोकेसचे साहित्य पूर्णपणे जाळून खाक झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आग आटोक्‍यात आणण्यासाठी कराड, कडेगाव व सह्याद्रीच्या अग्नीशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र कराड नगरपालिकेच्या अग्नीशामकच्या दोन गाड्या काही वेळातच घटनास्थळी पोहचल्या. यामुळे आग आटोक्‍यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश मिळाले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या भीषण आगीत या संस्थेचे सुमारे 15 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)