ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

कराड : शहरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळी वारा आणि गारांसह जोरदार पावसाने कराड शहरासह तालुक्‍याला झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून व झाडांच्या फांद्या मोडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तसेच जखिणवाडी फाट्यावर ट्रकने अज्ञाताला उडवल्याची घटना घडली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामूळे शहरातील विजपुरवठाही खंडीत झाला होता.

रविवारी सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. ऊकाड्याने सर्वजण हैराण झाले होते. सायंकाळी अचानक काळे ढग दाटून येवून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.सोबत विजांचा कडकडाटही सुरू होता. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. रविवारी कराडचा आठवडी बाजार असल्याने परिसरातील गावोगावचे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतात. त्यांचीही अचानक आलेल्या पावसाने धावपळ उडाली. निवारा शोधन्यासाठी पळापळ करावी लागली. यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कराड शहरासह तालुक्‍यातील ओगलेवाडी, मसूर, ओंड उंडाळे, कार्वे, शेणोली, वडगाव आदी भागातही मुसळधार पाऊस झाला. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना त्यातून प्रवास करताना कसरत करावी लागली.

रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने दत्त चौक, क्रष्णा नाका, पंचायत समिती परीसर, कराड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोररील झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या होत्या. तसेच कॉसमॉस बॅकेसमोरील झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकांनी रस्त्यावरील झाड तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटूल्याने शहरातील वीजपुरवठा बराचवेळ खंडीत झाला होता. पूणे बेंगलोर हायवेवर झाडे पडल्याने हायवे बराचवेळ जाम झाला होता. याचवेळी जखिणवाडी फाट्यावर ट्रकने अज्ञाताला धडक दिल्याने गंभीर झाल्याची घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)