कराडमध्ये स्वरनिर्झर संगीत महोत्सव उत्साहात

शास्त्रीय गायनाने कराडकर मंत्रमुग्ध ; आवाज साधना कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड – शास्त्रीय संगीत प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वरनिर्झर संस्थेतर्फे कै. स्वरगंधा टिळक यांच्या स्मरणार्थ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवास सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी सभागृहामध्ये राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, कराड अर्बन बॅंकेचे चेअरमन डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, स्वरनिर्झरच्या संचालिका आलापिनी जोशी, सुप्रिया देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ. सौ. विशाखा चिंचणीकर यांनी आवाज ः तंत्र व मंत्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये कु. शिवानी मिरजकर, आनंदगंधर्व आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन झाले.

आवाज साधना कार्यशाळा या पहिल्या सत्रामध्ये डॉ. सौ. चिंचणीकर यांनी श्वसनक्रिया आणि आवाजनिर्मिती क्रिया समजून घेणे, मुलांसाठी आवाज फुटण्याच्या दरम्यान घेण्याची खबरदारी, योग्य बैठक आणि त्यासाठीची आसने. श्वासाचा व एकूणच शारिरिक क्षमतेचा योग्य वापर, आवाजातील मृदुता व पल्ला कसा वाढवणे यावर सखोल मार्गदर्शन केले. चांगल्या आवाज निर्मितीसाठी मेंदू, कान, श्वास, कंठ व अन्ननालिकेचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. निसर्गदत्त आवाजाचे महत्व सांगून आवाज साधना शास्त्रातर्फे निसर्गदत्त आवाजाला संस्कारित करुन संगीत व भाषणासाठी उत्तम आवाज तयार करता येतो.

आवाज हा हृदयाला भिडणारा असावा. गायनासाठी श्रवण संस्कार गरजेचे असून यासाठी मंदू, कान, श्वास, कंठ, घशाची पोकळी यांची शास्त्रीय माहिती, कार्य व क्षमता महत्वाच्या आहेत. दुसरच्या आवाज नक्कल न करता आपल्या निसर्गदत्त आवाजामध्ये गायल पाहिजे असे सांगून थेअरी, व्यायाम, आसन तसेच संगीत साधनेसाठी सूर्यनमस्काराचे महत्व, व विविध योग मुद्रांची माहिती डॉ. सौ. चिंचणीकर यांनी दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिध्द शास्त्रीय संगीत गायिका कु. शिवानी मिरजकर, आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी शास्त्रीय संगीतातील विविध पैलूंचा उलघडला त्यांनी आपल्या गायनातून केला.
स्वरनिर्झरच्या संचालिका आलापिनी जोशी यांनी प्रास्ताविकात स्वरनिर्झर संस्थेमार्फत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

या महोत्सवास सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील संगीत क्‍लासेस, विविध शाळांमधून सुमारे 450 हून संगीतप्रेमींची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. गायन, वादन, नृत्याचे विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक, वक्ते याबरोबरच पालक व संगीतप्रेमींची महोत्सवास मोठी उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)