कराडमध्ये आज ‘विश्‍वासघात दिवस’; जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने आयोजन

कराड- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. या निषेधार्थ जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने सोमवार दि. 28 रोजी विश्वासघात दिवस व पेट्रोल- डिझेल दरवाढीचा निषेध केला जाणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी दिली.

चार वर्षापूर्वी मोदींनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखवली व आश्वासने दिली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते दिली. सत्तेवर आल्यावर आपल्या आशा, आकांक्षा, दिलेली आश्वासने मोदी पूर्ण करतील अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे, हे चार वर्षाच्या भाजपच्या सत्ताकाळानंतर आता स्पष्ट झाले आहे. प्रत्येक वर्षी देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती खालावत असताना केंद्रातील आणि विविध राज्यातील भाजपची सरकार जनतेच्या पैशांवर हजारो कोटींच्या जाहिराती देऊन उत्सव साजरा करत आहे. पेट्रोलच्या किंमतीचा विचार केल्यास त्यातील 50 टक्‍क्‍यांहून अधिक रक्कम राज्य आणि केंद्र सरकारने लावलेल्या विविध करांमुळे द्यावी लागते. डिझेल बाबत हे प्रमाण 40 टक्क्‌यांहून जास्त आहे.

इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणावे ही कॉंग्रेस पक्षाची मागणी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगी पेट्रोलियम कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाला महागाईच्या खाईत लोटत आहेत. 2015 साली दुष्काळाच्या निमित्ताने पेट्रोल, डिझेलवर लावलेला 2 रुपये प्रति लिटरचा सेस आज दुष्काळ संपून दोन वर्षे झाली तरी आजही महाराष्ट्र सरकार वसूल करत आहे. महामार्गांवरील दारूची दुकाने बंद झाली म्हणून बुडालेल्या महसुलाची वसूली पेट्रोलवर 2 रु. प्रति लिटर सेस लावून राज्य सरकारने सुरू केली होती. आता दारू दुकाने परत सुरू झाली तरी सेसची वसूली सुरूच आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार नाही लूटमार सरकार आहे. या निषेधार्थ सोमवारी सातारा येथील कॉंग्रेस कमेटीत दुपारी एक वाजता विश्वासघात दिवस होणार आहे. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार आनंदराव पाटील यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)