कराडमधील 85 फूटाच्या रस्त्याबाबत पालिकेस निवेदन

कराड – भेदा चौक ते कार्वे नाका येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणारा 85 फूट रस्ता रद्द होण्यासाठी स्थानिक मिळकत धारकांनी एकत्रित येण्याचे आवाहन मार्केट येथील संजय बबन शिंदे यांनी निवेदनाद्वारे केले आहे. अन्यथा 85 फुटांचे भूत कराडकरांच्या मानगुटीवर बसेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन कराड नगरपालिकेचे नगरअभियंता एम. एच. पाटील यांना मंगळवारी त्यांनी दिले आहे.

निवेदनातील माहिती अशी, भेदा चौक ते कार्वे नाका या रस्त्यास 3 जानेवारी 2017 मध्ये राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. तरी प्रत्यक्ष कामकाजास मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. यामध्ये या रस्त्याच्या सेंटरपासून दोन्ही बाजूला 13 मीटर म्हणजेच 85 फुटावर गटर्स व फूटपाथ होणार आहेत. खासगी ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येवून रस्त्याची मापे घेवून मंगळवारी दगड लावलेले आहेत. त्यानंतर भूमिअभिलेखचे अधिकारी प्रत्यक्ष मोजमाप करून अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर बाधित लोकांना नोटिसा दिल्या जातील. या रस्त्यामुळे मिळकतधारकांना फटका बसणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भेदा चौक ते कार्वे नाका हा रस्ता पूर्वी 142 नंबरचा खंडाळा, पळशी, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कराड, पलूस, सांगली, जयसिंगपूर, शिरोळ असा राज्यमार्ग होता. त्याचे रूपांतर राज्य महामार्गात झाले. कराडच्या डेव्हल्पमेंट प्लॅनमध्ये हा रस्ता 50 फूटाचा होता. त्यानंतर सुधारित आराखड्यामध्ये हा रस्ता 60 फूटांचा झाला आहे. आता तर 85 फूट रस्ता होणार असल्याने मिळकत धारकांचे नुकसान होणार आहे. कराडचा 100 फूटी रस्ता रद्द करण्यासाठी ज्याप्रमाणे राजकीय मंडळी, स्थानिक मिळकतधारक व नगरपालिका यांनी संयुक्‍तिकपणे लढा देवून रस्ता रद्द केला. त्याचप्रमाणे 85 फूटाचा रस्ता रद्द करण्यासाठी सर्व मिळकत धारकांनी एकत्रित यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. हा लढा केंद्र सरकारबरोबर आहे त्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, अन्यथा 85 फूटाचे भूत कराडकरांच्या मानगुटीवर बसेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)