कराडचे प्रदर्शन राज्यपातळीच्या दर्जाचे : प्रभाकर देशमुख

कृषि प्रदर्शन समारोप – बाजार समितीने गटशेतीचा प्रयोग राबवावा

कराड – 
आजची देशाची अन्नसुरक्षा महत्वाची आहे. ती जगविण्याची प्रमुख जबाबदारी बळीराजाची आहे. जगाच्या पोशिंदा जगला पाहिजे, तर अन्नसाखळी सुरळीत चालेल. या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम कराड बाजार समितीच्या माध्यमातून होत आहे. ही उल्लेखनिय बाब आहे. बाजार समितीने भरविलेले हे प्रदर्शन राज्यपातळीच्या दर्जाचे असल्याचे मत माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.

येथील स्वातंत्र्य सैनिक भाजीपाला मार्केट सभामंडपात आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण कृषिभूषण पुरस्कार व कृषी प्रदर्शन समारोप सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर हे होते. यावेळी रयत साखर कारखान्याचे चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा बॅंकेचे संचालक दादासाहेब गोडसे, संपतराव शेवाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रवीण पवार, कृषी अधीक्षक सुनील बोरकर, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, अंकुश परिहार, रंगराव थोरात, जगन्नाथ मोहिते, सभापती मोहनराव माने, उपसभापती अशोकराव पाटील, सर्व संचालक उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी गेली 15 वर्षापासून वेगळे व्यासपीठ निर्माण करुन दिले असून कृषि, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन असा त्रिवेणी संगम साधला आहे. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माहितीचे दालन खुले करण्यात आल्याने शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आहे. आज 82 टक्के पेक्षा जास्त अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या झालेली आहे. त्यामुळे शेतीत नवीन तंत्रज्ञानाने शेती करणे एकट्याला परवडणारे राहिले नाही.

यासाठी गटशेती करण्याची गरज निर्माण झाली आहे. यादृष्टीने भविष्यात बाजार समितीच्या माध्यमातून गटशेतीचे प्रयोग राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचवावे. एकात्मिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला पाहिजे. शेती करताना अधिक उत्पन्न घेत असलेल्या पिकांची निवड करणे, जोडधंद्याची साधने उपलब्ध करणे व कौशल्य विकासअंतर्गत शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेवून शेती केल्यास ती किफातशीर अशी होईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. असेही देशमुख यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी जगन्नाथ मोहिते, वसंतराव जगदाळे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रमुख मान्यवरांचे हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण शेतीनिष्ठ कृषिभूषण पुरस्कार कराड दक्षिणमधून जयवंत जगताप (वडगाव हवेली) यांना पहिल्या क्रमांकाचा रोख रक्कम 51 हजार व प्रमाणपत्र असा देण्यात आला. द्वितीय क्रमांक शहाजी शेवाळे (मनव) 31 हजार व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक कृष्णत पाटील (बामनवाडी/शिबेवाडी) 21 हजार व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर कराड उत्तर मधून प्रथम क्रमांक राहुल पाटील (पार्लेकर), द्वितीय क्रमांक वैभव इंगवले (रिसवड), तृतीय क्रमांक पांडुरंग सावंत (अंधारवाडी) यांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार, 21 हजार व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक सभापती मोहनराव माने यांनी केले. आभार महादेव देसाई यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)