कराडचे नगरवाचनालय 162 वर्षांचे

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

कराड – अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक व संस्मरणीय ठरलेल्या 1857 च्या काळात कराड नगरपालिकेच्या नगरवाचनालयाची सुरुवात झाली. आज या नगरवाचनालयाने 162 व्या वर्षात पदार्पण केले असून ते जिज्ञासू वाचकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करत आहे.

दिवंगत स्व. पी. डी. पाटील, श्री. म. कुलकर्णी व शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरराव करंबेळकर यांच्या माध्यमातून उभे राहिलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांत्तर झाले आहे. मोजके ग्रंथ व अल्प वर्गणीदारांच्या सहकार्याने सुरु झालेल्या ग्रंथालयात आज 62 हजार ग्रंथ तर 287 नियतकालिके आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्द्रु, कन्नड, गुजराती आदी भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. या वाचनालयात दैनिके 27, साप्ताहिके 17, पाक्षिके 5, मासिके 72, द्विमासिक व त्रैमासिके 9, तर 163 वार्षिके वाचनालयात येतात. त्याचबरोबर 1903 पासूनचे अंक व 1860 पासूनचे ग्रंथ उपलब्ध आहेत. 150 वर्षापूर्वीची जुनी पंचांगे, 1938 पासूनचे कल्याण मासिकांचे अंक जतन करुन ठेवण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटणचे नागोजीराव पाटणकर वाचनालय

पाटण शहारातील वाचकांसाठी वाचनाचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम स्व. भीमराव नागोजीराव पाटणकर यांनी केले.वाचन संस्कृतीच्या प्रसाराचा वसा घेवून वाचनालयांची चळवळ त्यांनी उभी केली. स्वतःकडील सुमारे 300 ग्रंथसंपदा वाचनालयास भेट देऊन वाचन संस्कृती जपण्याचे पहिले पाऊल त्यांनी पाटणमधील नागोजीराव पाटणकर वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवून केली. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेले या ग्रंथालयाने ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचे जतन करण्याचे महत्वाचे काम केले आहे.

तालुक्‍यातील ग्ररंथालय चळवळ वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात या वाचनालयाचा सहभाग असतो. विविध प्रकारची पुस्तके, मासिके, साप्ताहिके तसेच दुर्मिळ ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाचनाची चळवळ टिकवून ठेवण्यात नागोजीराव पाटणकरवाचनालयाचा सिंहाचा वाटा आहे. तालुक्‍यातील प्रमुख असणाऱ्या वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार मिळाला आहे. तर जिल्हा ग्रंथालय संघाचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार मिळाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)