कराडचा बुलंद आवाज फारुक पटवेकर

नुकत्याच झालेल्या कराड नगरपालिकेच्या स्विकृत सदस्य निवडीत फारूक पटवेकर यांना चौथ्यांदा सभागृहात येण्याची संधी मिळाली आहे. सत्ताधारी भाजपमुळेच तब्बल 12 वर्षानंतर ही मला संधी मिळाली आहे. या यशात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व विद्या पावसकर, नगरसेवकसुहास जगताप, माझे निकटचे सहकारी इंद्रजित गुजर यांच्या बहुमुल्य साथीमुळेच व पाठिंब्यामुळेच मला हे पद मिळाले आहे. त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. तसेच ही निवड करून भाजपाने आपला शब्द पाळला असून त्यांनी माझ्यावर विश्‍वास टाकून मला काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचा शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रभातशी बोलताना व्यक्‍त केली. त्यांच्या पुढील वाटचालीस दै प्रभातच्या वतीने बहुमोल शुभेच्छा!

कराड नगर पालिकेच्या इतिहासात अनेक अभ्यासू नगरसेवक होऊन गेले. ज्यांनी अलीकडच्या काळात पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासाचा मजबूत पाया रचला. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे फारुकभाई पटवेकर यांचे. तमाम हिंदू-मुस्लीम यांच्यात सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांची शहराला ओळख आहे. त्यांनी त्यांच्या बुलंद आवाजाने पालिकेचे सभागृह नेहमीच गाजवले आहे. त्यांची नुकतीच कराड नगर पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली असून सभागृहाला पुन्हा एकदा त्यांचा बुलंद आवाज ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या या निवडीबाबत घेतलेला त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा अल्पसा आढावा…

पटवेकर यांचे आजपर्यंतचे काम हे इतर सदस्यांना प्रेरणादायी असेच आहे. सन 1991 ला त्यांनी पालिका राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून विकासासाठी व शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी पटवेकर यांनी घेतलेले निर्णय व केलेल्या सूचना कौतुकास्पद अशाच आहेत. त्यामुळे अभ्यासू व्यक्‍तिमत्त्व म्हणून ते सभागृहासह नागरिकांमध्ये ओळखू जाउत्र्‌ लागले. नगर पालिकेच्या शतकोत्तर महोत्सव काळामध्ये 26 टक्के संकलित कर आकारण्यात आला होता. याबाबत लोकचळवळ उभारून प्रशासानाला अन्यायकारक संकलित कर कमी करण्याबाबत गतकाळात केलेला त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. 26 टक्के आकारलेला कर 23 टक्‍के करण्यात पटवेकर यांची महत्वाची भुमिका होती. त्याचबरोबर नगरपालिका अधिनियम त्यांचे पाठ असल्याने व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे कराडमधील अनेक प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात पटवेकर यांना यश आले आहे.

नगरसेवक व उपनगराध्यक्ष असताना दत्त चौकमध्ये उभारलेला पुर्णाकृती अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. कोल्हापूर नाक्‍यावर उभारलेला पुर्णाकृती महात्मा गांधीजीचा पुतळा यासाठी फारूक पटवेकर यांनी प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर दत्त चौक ते कोल्हापूर नाका ते कार्वे नाका याठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईपलाईन काम झालेले नव्हते. हे काम पूर्ण करण्यासाठी फारूक पटवेकर यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. कराडमधील तीन समाजमंदीर उभारण्यामध्येही त्यांचे योगदान मोलाचे आहे. समस्त भोईराज नाईक मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदीर गोरोबाकाका कुंभार समाजमंदिर उभारण्यासाठीही त्यांनी योगदान दिले आहे.

कराड नगरपालिकेत एकाच कुटुंबातील बहिण-भाऊ, वाहिनी- दीर आणि पती-पत्नी असे प्रतिनिधी म्हणून ते निवडून आले आहेत. यामध्ये फारूक पटवेकर आणि त्यांची बहीण अलमास बशीर इबुशे आणि माजी नगराध्यक्ष स्व. जयवंत जाधव व त्यांच्या वहिनी शारदाताई जाधव त्याचबरोबर अशोक यशवंत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना अशोक पाटील हे एकाचवेळी कराड नगर पालिकेच्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करीत होते. तत्कालीन पोलीस अधिक्षक माधव सानप यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये फारूक पटवेकर यांनी कराडच्या ऐक्‍यासाठी केलेले प्रयत्न व सुरु असलेली धडपड याचा उल्लेख केला आहे. एका प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली ही साक्ष म्हणजे त्यांच्या कामाची पोहोच पावतीच म्हणावी लागेल. सातारा जिल्हा पोलीस आणि सातारा जिल्हा प्रशासकीय पातळीवर फारूक पटवेकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखलघेवून त्यांचा अनेकवेळा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला आहे. मध्यंतरी महाराष्ट्रभर मराठा समाजाचे आरक्षणाबाबत मोर्चे निघत होते त्यालाही पटवेकर यांनी मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शविला होता. तसेच मोर्चासाठी जाणाऱ्या लोकांसाठी नाश्‍ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली होती. शहराच्या सामाजिक व विकासाच्या कार्यात त्यांच्या नेहमीचा सहभाग असो. कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे हीचत्यांची कार्यपद्धती असून त्यामुळेच ते जनमानसात लोकप्रिय आहेत. यापुढील काळात शहराच्या अनेक प्रलंबित असणाऱ्या प्रश्‍नांना पालिकेच्या सभागृहात आवाज उठणार आहे. त्यांचा आवाज बुलंद असून कोणताही प्रश्‍न मांडण्याची त्यांची हातोटी वेगळीच आहे. त्यांच्या बुलंद आवाजाने पालिकेचे सभागृह पुन्हा एकदा गाजणार आहे. तसेच त्या माध्यमातून त्या सोडविल्याही जाणार आहेत. फारूक पटवेकर यांना पुन्हा पालिकेत येण्याची संधी मिळाल्याने नागरिकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पत्नी व नगरसेविका मिनाज पटवेकर यांनीही त्यांच्या आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यात मोलाची साथ दिली आहे. यापुढील काळातही पालिकेत काम करीत असताना शहराच्या विकासासाठी त्यांची पटवेकर यांना साथ असेलच. त्यामुळे दोघे पती-पत्नी यापुढे शहराच्या प्रश्‍नांसाठी झगडताना दिसतील यात काही शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)