कराडकरांच्या नशिबीही कोंडीचे ग्रहण

प्रभात  स्पेशल
 
कराड – कराड शहरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब होऊन बसली आहे. तालुक्‍याचे ठिकाण व येथे असणाऱ्या सोयी सुविधांमुळे तालुक्‍यातील इतर गावाबरोबरच पाटण, कडेगाव, इस्लामपूर येथूनही दररोज लोकांची कराडला वर्दळ असते. वाहनधारकांचीही संख्या वाढल्याने शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसते. कोल्हापूर नाका परिसरात असणारी मंगल कार्यालये व इतर कारणांमुळे अनेकवेळा वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होतो. येथील वाहतूक सुरळीत होण्यास एक ते दोन तासांचा कालावधी लागतो.

यातून एखादी रुग्णवाहिका आल्यास ती जाण्यासाठीही रस्ता मोकळा होत नाही. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहेत. कराड शहरात कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा चौक, शाहू चौक, दत्त चौक, कृष्णा नाका, बसस्थानक, मुख्य पोस्ट ऑफिस, कै. प्रभाकर बळवंत चौक, आझाद चौक, चावडी चौक, प्रीतिसंगम घाट परिसर, लाहोटी कन्याशाळा, कृष्णा कॅनॉल, विद्यानगर व मलकापूर परिसरात सकाळी नऊ ते अकरा व सायंकाळी पाचनंतर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्याने या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच होऊन बसली आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरात असणारी अस्ताव्यस्त पार्किंग व्यवस्था याला कारणीभूत असून पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर कारवाईची पाऊले उचलणे गरजेचे आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)