कराची विक्रमी थकबाकी; वसुलीसाठी आजपासून मोहीम

प्रभारी आयुक्तांकडून प्रभागनिहाय वसुलीचे टार्गेट

नगर: महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणेशी झाली आहे. वाढती थकबाकी आणि वसुली कमी, यामुळे या थकबाकीची विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी महापालिकेने बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. या थकबाकीदारांवर आजपासून (सोमवार) कारवाई सुरू होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या निवडणुकीमुळे इच्छुक उमेदवारांकडून काहीशी थकबाकी वसुली झाली होती. त्यामुळे गेल्या महिन्यात वसुलीचा आकडा काहीसा वर दिसतो आहे. परंतु, एकूण संकलित कराची थकबाकी ही 240 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यात 98 कोटी रुपये ही रक्कम शास्ती माफीची आहे. त्या तुलनेत वसुली कमीच आहे. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी थकबाकी वसुलीसाठी गंभीर दखल घेतली आहे. द्विवेदी यांनी वसुलीसाठी बड्या थकबाकीदांरावर कारवाईचे आदेश दिले आहे. कर विभागाचे उपायुक्त सुनील पवार यांना हे आदेश दिले आहे. पवार यांनी देखील त्यानुसार बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, कारवाईचा मुहूर्त आज सोमवारचा ठेवला आहे.
थकबाकीची वसुली करताना अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येतात.

द्विवेदी यांनी या अडचणी सोडविण्याची जबाबदारी देखील पवार यांच्यावर टाकलेली आहे. मालमत्ता वसुलीचे काही प्रकरणात वाद आहेत. ते सोडवून थकबाकी वसुली करून घ्या, न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्यास ते तडजोडीने सोडवून वसुली करा, अशा सूचना द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही अधिकारी व कर्मचारी वसुलीतून पळवाट काढत आहे. वसुली करताना अडचणी सांगत आहे. या अडचणी नित्याच्याच आहे. त्या दूर करून वसुली करा, असेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

वसुलीत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर द्विवेदी स्वतः कारवाई करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रभागनिहाय वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे. या उद्दिष्टाची पूर्तता न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेतन रोखण्याची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. या कारवाईच्या धास्तीने वसुलीवर अधिकारी व कर्मचारी उद्यापासून (सोमवार) कार्यवाही करणार असल्याचे महापालिका प्रशासनातून सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)