कराचीत चिनी दुतावासाजवळ धुमश्‍चक्री

तीन हल्लेखोरांसह एकूण पाच जण ठार

कराची: अज्ञात बंदुकधाऱ्यांनी आज शहरातील चीनच्या दूतावासाजवळ गोळीबार केला. थेट दूतावासात घुसून तेथे धुमाकुळ घालण्याचा त्यांचा इरादा होता पण तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. तिघाही हल्लेखोरांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. तथापि या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारीही ठार झाले आहेत. तसेच हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात अन्य चार जण जखमी झाले आहेत.

हल्लेखोरांनी तेथे काही बॉंम्बही फोडल्याचे वृत्त आहे. त्याचा आवाज चिनी दुतावासातही आला. हल्लेखोर नेमके किती होते याचा सुरूवातीला कल्पना आली नाही. हल्लेखोरांनी दूतावासाच्या गेटच्या बाहेरच आपली गाडी पार्क केली. नंतर ते गेटजवळ आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात दोन पोलिस ठार झाले. पण त्याचवेळी अन्य सुरक्षा जवान धाऊन आले. त्यांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्तयुत्तर दिले. त्यात हे तिघेही हल्लेखोर ठार झाले. नंतर लगेच हे गेट बंद करून घेण्यात आले आणि चिनी दूतावासातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

थेट दूतावासात घुसुन तेथे हल्ला करण्याचा व तेथील काही जणांना ओलिस ठेवण्याचा त्यांचा इरादा असावा असा कयास आहे. कारण हल्लेखोरांजवळ बंदुका व दारूगोळ्यासह मोठ्या प्रमाणात अन्न पाकिटेही होती. म्हणजेच दूतावासात घुसून तेथे ओलीस नाट्य जर बराच काळ चालले तर सोबत अन्न असावे म्हणून त्यांनी ही तयारी केली असावी असा कयास आहे.

सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. तेथे हल्लेखोर आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाल्यानंतर तेथे अन्यही सुरक्षा कुमक तातडीने पोहचली. या भागातील अन्य कार्यालये तातडीने बंद करण्यात आली होती. हा भाग क्‍लिअर केल्यानंतरच तेथील व्यवहार पुन्हा सुरू करण्यास अनुमती देण्यात आली. ठार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटू शकलेली नाही. कराचीच्या क्‍लिफटन भागात हे चिनी दूतावास आहे. हा भाग अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेला भाग आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)