करवाढीविरोधात 12 डिसेंबरला ठिय्या आंदोलन 

मनमानी कारभारा विरोधात : ऍड. निकम यांचा घणाघात 

फलटण -शहरामध्ये नगर पालिका अशा काय सुविधा पुरवत आहे जेणे करून कर वाढवावा लागला. मूलभूत सुविधाही नगरपालिका पुरवू शकत नाही. सुविधा देत नाही आणि कर वाढवता. मनमानी कारभार करायला ही तुघलकाची सत्ता आहे काय? असा घणाघात ऍड. नरसिंग निकम यांनी केला.

-Ads-

फलटण शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन खाजगी संस्थेकडून करून केलेली कर आकारणी चुकीची असून तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी माळजाई मंदिरात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. बैठकीत व्यापारी व नागरिकांनी करवाढ रद्द झाली पाहिजे अशी एकमुखी मागणी केली. त्यानंतर करवाढ रद्द करण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांच्याकडे देऊन जर मागणी पूर्ण झाली नाही तर दि. 12 डिसेंबरला ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी करवाढ नियमाप्रमाणे असून 2012-2013 मध्ये झाली होती. त्यानंतर 4 वर्षानी करमूल्यांकन करायचे होते. परंतु, पालिका निवडणुकीमुळे मूल्यांकन करण्यात आले नव्हते. तेच मूल्यांकन आता आपण करतोय म्हणजे सहा वर्षांनी करवात होतेय, असे स्पष्टीकरण मुख्यधिकारी यांनी दिले. परंतु, 2016 मध्ये नागरिकांनी मूल्यांकनास विरोध केला नव्हता. पालिकेने तिच्या सोयीने मूल्याकंन पुढे ढकलले होते. त्याचा फटका सामान्यांना का देता? नियमानुसार दर चार वर्षांनी म्हणजे 2020-2021 मध्ये मूल्यांकन करावे अशी मागणी नागरिकांनी केली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेने भरमसाठ कराच्या नोटिसा पाठवल्या आहेत. त्या पूर्णपणे बेकायदा आहेत. एक रुपयाही कर वाढ होवू देणार नसून पुढील बुधवारपर्यंत करवाढ कमी केली नाही तर दि. 12 पासून पालिकेच्या पुढे ठिय्या आंदोलनास बसणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी ऍड. नरसिंग निकम, विरोधी पक्षनेता समशेरसिंह नाईक-निंबाळकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम, नगरसेवक अशोक जाधव, सचिन सुर्यवंशी (बेडके), सचिन अहिवळे, नगरसेविका सौ. मदलसा कुंभार, शहराध्यक्ष उदय मांढरे, तुकाराम शिंदे, सुशांत निंबाळकर, रवींद्र फडतरे, शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, मिना नेवसे, श्रीमती मंगलादेवी नाईक-निंबाळकर, उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)