करमनवाडी ग्रामस्थांकडून शाळेला संगणक भेट

खेड – कर्जत तालुक्‍यातील करमनवाडी ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देण्यात आला. प्रजासत्ताकदिनी ग्रामस्थांकडून ही भेट मिळाल्याने विद्यार्थ्यांना आता संगणकावर धडे गिरवणे शक्‍य झाले आहे.

करमनवाडी येथे ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद शाळेला वेळोवेळी मदत मिळत असल्याने शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत. सागर जाधव यांच्याकडून संगणक टेबलही भेट देण्यात आला. यावेळी सरपंच अंकुश बनसोडे, उपसरपंच राजेंद्र पवार, माजी सरपंच काशिनाथ खराडे, सदस्य आगतराव पावणे, नवनाथ सायकर, फुलाबाई पुणेकर, सीताबाई पुणेकर, भरत बनसोडे, राम लांबोर, प्रा. शहाजी हराळे, संभाजी मेरगळ, गणेश मेहेर, गणपत सायकर, संदीप पवार, भरत पावणे, शरद पावणे, रासपचे तालुका संपर्कप्रमुख भरत लांबोर यांच्यासह मुख्याध्यापक बबन सावंत, दत्तात्रेय शेटे, चंद्रकांत गावडे, मंजूश्री चव्हाण, ताई सूर्यवंशी व नंदा खर्चे, आदी मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. दत्तात्रेय शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. भरत लांबोर यांनी शाळेला आणखी मदत मिळवून शाळा आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)