करबुडव्यांच्या दारात यंदाही वाजणार “बॅन्ड-बाजा’

1,200 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट

पुणे – महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असून, थकबाकी वसुलीसाठी आता थकबाकीदाराच्या दारात बॅन्ड वाजवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. या आधीही अशाच प्रकारचा प्रयत्न दरवर्षी महापालिकेकडून करण्यात येतो. 1 डिसेंबरपासून या कारवाईला सुरूवात करण्यात येणार आहे.

-Ads-

सन 2018-19 या चालू आर्थिक वर्षात 872 कोटी रुपयांचा मिळकतकर जमा आला आहे. या वर्षाअखेर 1,200 कोटी रुपयांचे उद्दिष्ट विभागातर्फे ठेवण्यात आल्याचे करआकारणी-करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. मागीलवर्षी 1 हजार 84 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

दरवर्षीच महापालिकेकडून थकबाकीसाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. त्यामध्ये “अभय’ योजनेचाही समावेश होता. मात्र, मुदतीत कर न भरलेल्यांकडून दंड आकारणीही करण्यात येते. यंदा डिसेंबरपासून करवसुली मोहीम सुरू करण्यात येणार असून, जे कर भरणार नाहीत त्यांच्या मिळकतींसमोर बॅन्ड वाजवून ती वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय पैसे न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याची कारवाईही करण्यात येणार असल्याचे कानडे यांनी सांगितले.

शहरात सुमारे 9 लाख मालमत्ता असून, समाविष्ट गावांमध्ये त्यात आणखी भर पडणार आहे. बहुतांश मालमत्तांची नोंदणी करण्यात आली असून; सुमारे दीड लाख मालमत्ता याठिकाणी आहेत. या गावातील मालमत्तांवरील करवसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या गावांमधून महापालिकेला यंदा 50 ते 60 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षाही कानडे यांनी व्यक्त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)