करदात्याची संख्या दुपटीने वाढण्याची शक्‍यता – अरुण जेटली 

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कारकिर्दीत भारताचा एकूण कर आधार (टॅक्‍स बेस) दुपटीने वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. भारत-अमेरिका रणनीतिक भागीदारी मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अरुण जेटली यांनी सांगितले की, मोदी सरकार सत्तेवर येण्याआधी देशातील 3.8 कोटी लोक आयकर विवरणपत्र भरत होते. आता ही संख्या 6.8 कोटींवर पोहोचली आहे. वित्त वर्ष 2019 च्या अखेरपर्यंत देशात 7.5 कोटी करदाते असतील, असे अपेक्षित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालू वित्त वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात थेट करांचे शुद्ध संकलन (परतावे दिल्यानंतर) 14 टक्‍क्‍यांनी वाढून 4.44 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. तर थेट करांचे सकल संकलन (परताव्यांसह) 16.7 टक्‍क्‍यांनी वाढून 5.47 लाख कोटींवर पोहचले आहे. कर संकलनात झालेल्या वाढीमुळे तुटीपासून थोडा दिलासा मिळाला आहे. वार्षिक आधारावर कर परतावे 30.4 टक्‍क्‍यांनी वाढून 1.03 लाख कोटी रुपयांवर गेले आहेत. अप्रत्यक्ष करांचा नवा आराखडा आणि थेट करांच्या आराखड्यातील सुधारणा यामुळे कर संकलन वाढले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)