करदात्यांशी सौजन्याने वागा ; आयकर विभागाची अधिकाऱ्यांना सुचना 

नवी दिल्ली – आयकर विभागाचे अधिकारी करदात्यांशी मुजोरीने वागत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आयकर विभागाने आपल्या अधिकाऱ्यांसाठी एक सूचना दिली असून त्यात त्यांनी आयकरदात्यांशी सौजन्याने वागावे असा सल्ला दिला आहे. गेल्या 16 एप्रिलला एका नोटीशी द्वारे अधिकाऱ्यांना ही सुचना देण्यात आली आहे. टॅक्‍स पेयर्स सर्व्हिसेसच्या संचालकांनी ही सूचना दिली आहे. करदात्यांना चांगली सेवा देता यावी म्हणून हे स्वतंत्र संचलनालय आयकर विभागात काही वर्षांपुर्वी सुरू करण्यात आले होते. कर विभागाच्या अधिकाऱ्यांचे करदात्यांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी सौजन्यांचे वागणे असले पाहिजे. समजूतीच्या भावनेनेच त्यांनी त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे असेहीं त्यांना सांगण्यात आले आहे.

देशातील सर्वच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करदात्यांशी अत्यंत मुजोरीने वागतात त्यामुळे आपल्या विभागाची प्रतिमा मलिन होत आहे असे प्रकार होता काम नयेत असेही त्यांना सांगण्यात आले आहे. आयकर विभागाचे सर्व व्यवहार इंटरनेटवर होंत असले तरी बऱ्याच वेळा काही तक्रारी किंवा अडचणींच्यावेळी करदात्यांना आयकर अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्‍यक ठरते. अशा वेळी हे अधिकारी नीट वागत नाहीत असे करदात्यांचे म्हणणे असते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)