सत्तेसाठी काँग्रेसनं केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगावी लागते- नरेंद्र मोदी

करतारपूर गुरुद्वारावरून नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

हनुमानगढ (राजस्थान): राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी हनुमानगडमध्ये जाहीर सभा घेतली. दरम्यान त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. भारताच्या सीमेपासून केवळ चार किमी अंतरावर असलेले हे शिखांचे पवित्र ठिकाण केवळ कॉंग्रेसमुळेच पाकिस्तानात आहे. कॉंग्रेसच्या त्यावेळच्या नेत्यांना शिख भाविकांविषयी कोणतीच आत्मीयता नव्हती, त्यांना गुरूनानक देव यांच्या विषयी आदर नव्हता त्यामुळेच कर्तारपुरसाहिब हे शिखांचे ठिकाण पाकिस्तानात गेले असा आरोप त्यांनी केला.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर करतारपूर कॉरिडोरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर जोरदार शाब्दिक वार करत आहेत. ‘सत्तेचा मोह आपण समजू शकतो, पण सत्तेसाठी काँग्रेसनं केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगायला लागतेय. कॉंग्रेसने केलेली ही चूक सुधारण्याची संधी मला तुमच्या मतांमुळे मिळाली असे ते म्हणाले. कॉंग्रेस वर टीका करताना ते म्हणाले की पाच वर्षापुर्वी केवळ भ्रष्टाचाराच्या हेडलाईन्स वृत्तपत्रांत छापुन यायच्या तुम्हाला गेल्या पाच वर्षात अशी एक तरी हेडलाईन वाचायला मिळाली काय? असा सवालही त्यांनी केला.

Addressing a massive rally in Hanumangarh. Watch.

Addressing a massive rally in Hanumangarh. Watch.

Posted by Narendra Modi on Monday, 3 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)