करतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज 

नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते आज  करतारपूर कोरिडोरचे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्त पाकिस्तानने भारताला निमंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमात भारताकडून केंद्रीय मंत्री  हरसिमरत कौर बादल आणि हरदीप पुरी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय चर्चाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. करतारपूर कोरिडोरच्या भूमिपूजनासाठी पाकिस्तानच्या निमंत्रणावर भारत सहभागी होत असला तरी जोपर्यंत तेथील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे.

सुषमा स्वराज म्हणाल्या कि, अनेक वर्षांपासून भारत सरकार पाकिस्तानसोबत करतारपूर कोरिडोर खुला करण्यासंदर्भात चर्चा करत होती. आता त्यांनीही सकारात्मक उत्तर दिले आहे. परंतु, असे समजू नये कि दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरु होईल. कारण दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

-Ads-

दरम्यान, गुरुदासपूरमधील डेरा बाबानानकपासून करतारपूर साहिब नारोवाल दरम्यानच्या 4 किलोमीटरच्या कोरिडोरमुळे भारतातील शीख भाविकांना करतारपूर येथे व्हिसा शिवाय प्रवेश मिळू शकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)