करतारपूर कॉरिडॉर समारंभासाठी पाकिस्तानला न जाण्यास दोन कारणे : कॅप्टन अमरिंदर सिंह 

नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी करतारपूर कॉरिडॉर पायाभरणी समारंभासाठीचे पाकिस्तानचे निमंत्रण नाकारले आहे. पाकिस्तानला न जाण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दोन कारणे सांगितली आहेत. एक म्हणजे पंजाबमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय करत असलेल्या विघातक कारवाया (रविवारीच आणि दुसरे म्हणजे भारतीय लष्करावर पाकिस्तानी सैनिकांचा दररोज होणारा गोळीबार.

या गोळीबाराला भारतीय सैनिक बळी पडत आहेत. या दोन कारणांसाठी आपण करतारपूर कॉरिडॉर समारंभाला येऊ शकत नाही, असे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पाकिस्तानचे परराष्टृा मंत्री महंमद कुरेशी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 28 नोव्हेंबरला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान करतारपूर कॉरिडॉर कामाची पायाभरणी करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पाकिस्तानने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांना निमंत्रण दिले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)