करण जोहर आणि सुशांत सिंह रजपूतला मेलबर्न महोत्सवात पारितोषिक

मेलबर्न- निर्मात दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सुशांत सिंह रजपूत, कोंकणा सेन शर्मा आणि ऐश्‍वर्या राय बच्चन यांना मेलबर्न इथे झालेल्या “इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मधील पारितोषिकांसाठी निवडण्यात आले आहे. करण जोहरला “लीडरशीप इन सिनेमा ऍवॉर्ड’ने गौरवण्यात आले. “दंगल’, “पींक’ आणि “बाहुबली’सारख्या चित्रपटांमुळे या पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याची भावना करण जोहरने यावेळी व्यक्‍त केली.

“इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न’मध्ये यंदा करण जोहरचा “ए दिल ए मुश्‍कील’ सह अन्य 60 चित्रपट दाखवले गेले आहेत. फेस्टिव्हलमध्ये सुशांत सिंह रजपूतला “एम एस धोनी, द अनटोल्ड स्टोरी’मधील भूमिकेसाठी तर कोंकणा रणावतला “लिपस्टिक अंदर माय बुरखा’मधील भूमिकेसाठी अनुक्रमे सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर “ऍवॉर्ड फॉर एक्‍सलेन्स इन ग्लोबल सिनेमा’ ने ऐश्‍वर्या रायचा सन्मान करण्यात आले आहे. राहुल बोस दिग्दर्शित “पूर्ना’ला समानतेचा पुरस्कार तर अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या “पींक’ला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाने गौरवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)