करण जोहर आणि मनिष मल्होत्रा रिलेशनशीपमध्ये?

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांची गहिरी मैत्री उघड असली तरी दोघांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं कायमच टाळलं आहे. मात्र करण आणि मनिष रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. याचं कारण म्हणजे खुद्द मनिष मल्होत्राने दिलेले संकेत.

मनिष आणि करण जोहर एकमेकांना डेट करत असल्याचा रिपोर्ट ‘पिंकव्हिला’ या बॉलिवूड संकेतस्थळावर पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त मनिषने इन्स्टाग्रामवर दोघांचा एक फोटो शेअर केला होता. ‘हॅपी हॅपी बर्थडे माझ्या प्रिय जीवलग मित्रा. येणारं वर्ष उत्तम जावो. मैत्रीची आणि एकत्र काम करण्याची 25 वर्ष… आणि अजून येणारा दीर्घ काळ आपण एकत्र असूच. तू उत्तमोत्तम चित्रपट तयार करत राहोस. आणि असाच चैतन्यमय राहा.’ असं कॅप्शन मनिष मल्होत्राने दिलं आहे.

या फोटोखाली मनिषच्या चाहत्याने ‘तुम्ही सगळ्यात क्यूट कपल आहात’ अशी कमेंट केली आहे. विशेष म्हणजे ही कमेंट मनिषने लाईकही केली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मनिष मल्होत्राने दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना दुजोरा दिल्याचे म्हटले जाते.

25 मे रोजी करण जोहरने 47 व्या वर्षात पदार्पण केले, तर मनिष मल्होत्रा 51 वर्षांचा आहे. दुसरीकडे, मनिष मात्र अशा चर्चा मूर्खपणाच्या असल्याचे म्हणतो. करण माझ्या कुटुंबाचा भाग आहे, तो मला भावासारखा आहे, अशी प्रतिक्रिया मनिष मल्होत्राने काही प्रसारमाध्यमांना दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)