करण जोहरला करायचे होते ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न

करण जोहर कधीच स्वतःबद्दल बोलायला कोणतीच हरकत घेत नाही. तसेच इतरांबाबत बिनधास्त आणि बोल्ड वक्‍तव्ये करण्यासही तो कचरत नाही. त्याचा एक रेडिओ शो सध्या खूप गाजतो आहे. त्यामध्ये तो नेहमीच अशा बोल्ड प्रश्‍नांना तितकीच बोल्ड उत्तरे देत असतो. एका चॅट शो दरम्यान त्याला असाच एक बोल्ड प्रश्‍न विचारला गेला की जर संधी मिळाली असती, तर बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीबरोबर लग्न करायला आवडले असते. या प्रश्‍नावर जराही विचार न करता करण जोहरने बिनधास्तपणे करिना कपूर खानचे नाव सांगून टाकले.

करण आणि करिना दोघेही एकमेकांचे चांगले दोस्त आहेत. बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेमध्ये दोघेही खूप फेमस आहेत. प्रोफेशनल पातळीवरही या दोघांमधील केमिस्ट्री खूप चांगली आहे. याशिवाय खानदान की बात करे तो कपूर आणि जोहर खानदानाकडे बॉलिवूडमध्ये खूपच आदराने बघितले जाते. रणबीर कपूरनेही करणला याबाबत शुभेच्छा दिल्या होत्या. करण जोहरच्या रेडिओ शो मध्ये रणबीर कपूरनेही आपल्या लव्ह लाईफबाबतचा एक प्रश्‍न करण समोर मांडला होता. प्रत्येक रिलेशनशीपमध्ये नेहमीची चूक करू नकोस, असा बोलका कानमंत्रही त्याला करणकडून मिळाला होता. करण नक्की कोणत्या रिलेशनशीपमधील कोणत्या चुकांबाबत बोलतो आहे, हे रणबीरला आणि श्रोत्यांनाही समजले.

त्यामुळे जर हे समीकरण जुळले असते तर कोणालाही आश्‍चर्य वाटले नसते, पण करिनाला नवाब सैफची पर्सनॅलिटी अधिक पसंत पडली आणि करणला मात्र एकटेच प्लॅटफॉर्मवर राहायला लागले.

आता आपली अर्धवट राहिलेली इच्छा करण मुलांकडून पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. करणने दत्तक घेतलेली मुलगी आणि सैफ करिनाचा मुलगा तैमूर यांना भाऊ बहीण म्हणून गणले जाऊ नये. कारण भविष्यात त्यांचे नाते कसे असेल हे कोणीही सांगू शकणार नाही, असे करणने म्हटले आहे. रुही-तैमूरच्या नात्यात तो करिनाबरोबरचे हरवलेले नाते तर शोधत नसेल ना.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे “तख्त’साठी करिना आणि करण एकत्र काम करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)