करण जोहरचा ऑल टाईम फेवरेट ऍक्टर ‘शाहरुख’ नव्हे तर आहे ‘हा’!

करण जोहर मागील ३० वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्याची आणि सुपरस्टार शाहरुख खान याची मैत्री खूप आहे. त्यात या दोंघांनी सोबत खूप मोठे चित्रपट केले आहेत. परंतु त्याचा ऑल टाईम फेवरेट ऍक्टर हा शाहरुख नाही.

एका वृत्तसमूहाच्या मासिकाला दिलेल्या  मुलाखतीत कारणाने सांगितले की, त्याचा ऑल टाईम फेवरेट ऍक्टर हा रणबीर कपूर आहे , कारण तो एकमेद्वितीय आहे. ४६ वर्षी करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या ‘ये दिल है मुश्कील’ चित्रपट रणबीर मुख्य अभिनेता होता. त्याचबरोबर रणबीरचे ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘वेक उप सिड’ हे चित्रपट करण जोहरच्या ‘धर्मा’ प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रदर्शित झाले होते.

रणबीरचा आगामी चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ देखील ‘धर्मा’ प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. ज्यात अमिताभ बच्चन, रणबीर कापुर आणि आलिया भट हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)