करण-काजोलमधील दुरावा संपला

करण जोहरने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या आपल्या “ऍन अनसूटेबल बॉय’ या आत्मचरित्रात अभिनेत्री काजोलसोबत असलेली 25 वर्षांची मैत्री संपल्याचे म्हटले होते. पण आता या दोघांमधील वाद आता निवळला आहे. काजोलच्या वाढदिवसाच्या पार्टीला करणने जाऊन मैत्रीतील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला. तर करणच्या मुलांचा पहिला फोटो काजोलनेही लाइक करत दोघांमधील कडवटपणा कमी झाल्याचे स्पष्ट केले.

शाहरुखच्या “टेड टॉक्‍स’ या शोमध्ये करण जोहरने काजोलसाठी एक विशेष चिठ्ठी लिहिली आहे. त्याने या चिठ्ठीत आत्मचरित्रात काजोलबद्दल लिहिलेल्या कठोर शब्दांसाठी पश्‍चाताप व्यक्त केला आहे. करणने यावेळी काजोलसाठी एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्याने काजोल अजूनही माझी जवळची मैत्रीण असून माझ्यासाठी 25 वर्षांची ही मैत्री खूप विशेष असल्याचे त्याने या चिठ्ठीत नमूद केले आहे.

अजूनही त्याच्या चिठ्ठीला काजोलकडून कोणताही प्रतिसाद मिळाल्याचे समजत नाही. औपचारिकता म्हणून काजोलने वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या काजोलशी संवाद साधला असेलही कदाचित. पण तिच्याकडून उघडपणे करणच्या या मैत्रीपूर्ण संवादाचा स्वीकार झाल्याचे काहीही संकेत नाहीत. करणने ज्या कलाकार मंडळींशी पंगा घेतला आहे. त्यापैकी कंगणा रणावत, ऋषी कपूर आणि काजोल या तिघांपैकी काजोल आणि कंगणाची माफी करणने मागितली आहे. ऋषी कपूर यांच्याबरोबरचे भांडण त्याने स्वतःहून पुढाकार न घेताच मिटवण्याचा प्रयत्न केला होता. काजोल आणि कंगणा या तशा स्वाभीमानी अभिनेत्री असल्याने त्या सहजा सहजी करणला माफ करतील, असे वाटत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)