करण करणार “गे लव्ह स्टोरी’वर सिनेमा

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सध्या आगामी ‘तख्त’ च्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. “तख्त’ नंतर करण जोहर ‘गे लव्ह स्टोरीवर’ आधारित सिनेमा बनवण्याच्या विचारात आहे. ही माहिती त्याने स्वत:च एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. स्वित्झरलॅंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये त्याने या आगामी सिनेमाबद्दल माहिती दिली.

‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे आत्तापर्यंत झालेल्या तिनही सेशन्समध्ये मी सहभागी होतो. तीनपैकी एक सेशन “एलजीबीटी’ समुहाशी संबंधित होता. म्हणजेच लेस्बियन, गे, बायसेक्‍स्युअल, ट्रान्सजेन्डर होय. या समुहाविषयी असलेला हा सेशन मला प्रचंड आवडला. या सेशनमध्ये भारत आणि सुप्रिम कोर्टाच्या नियम 377 बाबत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समलैंगिक समुहावर आधरित या सेशनमध्ये करणला अनेक प्रश्‍नही विचारण्यात आले. यावेळी एका पत्रकाराने “एलजीबीटी’ समुहासाठी काय करायला आवडेल असे विचारले. तेव्हा एक चित्रपट निर्माता असल्यामुळे मी एक समलैंगिक प्रेमकथेवर आधारित सिनेमा बनवण्याचा विचार करतो आहे आणि या सिनेमासाठी मी दोन मोठ्या कलाकारांची निवडही केली आहे, इतक्‍यात मला त्या कलाकारांची नावे सांगायची नाही पण मला या विषयावर चित्रपट करायला खरंच फार आवडेल’ असे उत्तर करणने दिले आहे.

यापूर्वी “फायर’, “माय ब्रदर निखील’, “व्हाईल आय अॅम’, “मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’, “बॉम्बे बॉईज’, “मित्राची गोष्ट’, जस्ट अनदर लव्ह स्टोरी’ सारखे सिनेमे “एलजीबीटी’ समुहाशी संबंधित कथेवर आधारलेले होते. त्याशिवाय “अलिगड’सारख्या सिनेमाला तर विश्‍लेषकांनी नावाजलेलेही होते. मग करण जोहरला पुन्हा या विषयाला हात घालायची इच्छा का व्हावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)