करणी सेनेचे नेते सुरज पाल अमू पोलिसांच्या ताब्यात

गुरगाव – श्री करणी सेनेचे अखिल भारतीय सचिव सुरज पाल अमू यांना “पद्‌मावत’ चित्रपटाविरोधातील आंदोलन भडकावण्याबद्दल चौकशीसाठी गुरगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले होते. त्यांच्याशिवाय करणी सेनेच्या 31 कार्यकर्त्यांनाही कायदा आणि सुव्यवस्था मोडल्याबद्दल आणि जमावबंदीचे आदेश मोडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. गुरगावमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभुमीवर हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते.

बुधवारी गुरगावमध्ये एका स्कूल बसवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. “पद्‌मावत’ सिनेमाला विरोध करण्यासाठी रस्त्यांवरील वाहने पेटवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान करण्यात आले होते. त्यानंतर सुरज पाल अमू यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या समवेत ताब्यात घेण्यात आलेल्या 31 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)