करणी काढण्याच्या नावाखाली तरुणीचा विनयभंग

करणी काढण्याच्या नावाखाली तरुणीचा विनयभंग ; जबरदस्तीने केला खोटा विवाह
पुणे,दि.28(प्रतिनिधी)- मानसिक रुग्ण असलेल्या आईच्या अंगातील करणी काढण्याचा बहाणा करुन एका मांत्रिकाने तरुणीचा विनयभंग केला. या मांत्रिकाला खडक पोलिसांनी अटक केली.
राजु अप्पा साळवे(42, रा.घोरपडे पेठ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 23 वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. या मुलीच्या आईला मानसिक आजार आहे. तीचा आजार बरा करण्यासाठी तसेच अंगातील करणी काढून टाकण्यासाठी राजु साळवे याने तरुणीस करणी काढण्याचे साहित्य घेऊन घरी बोलावले होते. यानंतर देविच्या मंदिरात नेऊन तीला हिरवे कपडे व मंगळसूत्र घातले. तसेच विवाह केला असल्याचे जबरदस्तीने लिहण्यास भाग पाडले. तसेच आपला विवाह झाला असल्याचे सांगत तीच्याशी जवळीक साधत लगट करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी मुलगी उच्च शिक्षीत आहे, तर आरोपी हा एका इलेक्‍ट्रीशियन मुलाबरोबर त्यांच्या घरी आला होता. तेव्हा त्याने फिर्यादीच्या आईची परिस्थिती लक्षात घेऊन , मी तीला बरे करतो असा बहाणा केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)