करडेच्या यात्रेत रंगला कुस्त्यांचा आखाडा

निमोणे-येळकोट येळकोट जय मल्हार भैरवनाथाच्या नावाने चांगभलंच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात करडे (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा त्रिपुरारी पौणिमेच्या मुहूर्तावर दि. 22 व 23 रोजी मोठ्या भक्तीभावात पार पडली.
गुरुवारी सकाळी 11 वाजता पंडित बाळासाहेब वाईकर यांच्या सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर रात्री 8 वाजता देवाची पालखी मिरवणूक आणि रात्री 10 वाजात रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी दुपारी 3 ते 6 कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. यात सुमारे 500 मल्लांनी भाग घेतला. यात सुमारे 500 ते 11000 रुपयांपर्यंतच्या कुस्त्या पार पडल्या. यंदा करडे गावात पैलवानांच्या कुस्त्या ह्या वजन गटानुसार पार पडल्या. यावेळी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे हे उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून मधुकर रोडे, बाळासाहेब घायतडक, फक्कड रोडे, पोपट लंघे यांनी काम पाहिले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)