करंदी येथे सॅनिटरी नॅपकिन मशीन कार्यान्वित

शिक्रापूर – करंदी (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सर्व शालेय विद्यार्थिनी व महिलांसाठी नुकतेच दोन सॅनिटरी नॅपकिन मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
सरपंच ललिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या व्यवस्थापक रक्षा जाधव यांनी या मशीनचे उद्‌घाटन केले. गावातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या दोन्ही ठिकाणी दोन सॅनिटरी नॅपकिन मशीन कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. यावेळी पंचवीस कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आला. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी आर. आर. राठोड, गोरक्ष ढोकले, शिवाजी दरेकर, संजय दरेकर, नितीन कदम, विशाल खरपुडे, सुनिता कदम, कल्पना पिंगळे, मनिषा साकोरे, वनिता खेडकर, शोभा दरेकर, शिल्पा सोनवणे आदी उपस्थित होते. गावातील महिलांसाठी ठोस कार्यक्रम करावा म्हणून सरपंच ललिता शिंदे, उपसरपंच संगिता नप्ते तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)