करंदीत आजी-माजी सैनिकांचा सन्मान

केंदूर- करंदी (ता. शिरूर) येथे शिवसंग्राम सेवा संघ यांच्या वतीने परिसरातील सैनिकांचा नुकताच सन्मान करण्यात आला. धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीच्यानिमित्ताने भारतीय सेना दलात कार्यरत असणाऱ्या सुमारे 20 सैनिकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अशा स्वरूपाच्या आगळा वेगळा कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी कार्यक्रमास अतिक्रमण अधिकारी सुहास ढोकले, गोरक्ष ढोकले, माजी चेअरमन रमेश नप्ते, माजी सैनिक शिवाजी ढोकले, अनिल झेंडे, बाळासाहेब दरेकर, सैनिक रामदास दरेकर, भाउसाहेब दरेकर, दीपक ढोकले, ऍड. कांताराम नप्ते, नितीन दरेकर, सुरज घाडगे, आण्णासाहेब ढोकले, रवींद्र नप्ते, मनोज साकोरे, सागर सोनवणे, डॉ. मनोज शेळके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद दरेकर तर गोरक्ष ढोकले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)